Thursday, May 3, 2012

काळाच्या मुठीतून गेल जे निसटून फिरून उकराव कश्यापायी ?

काळाच्या  मुठीतून  गेल  जे  निसटून 
फिरून  उकराव  कश्यापायी ?

काळाच्या  मुठीतून  गेल  जे  निसटून 
फिरून  उकराव कश्यापायी ?

बुद्धी  ज्यांची  क्षीण 
वृत्ती  ज्यांची  हीन 
राग  अश्यांचा  धरावा कश्यापायी ? 

सुख  येचता  येचता  
संपो  अवघे  जीवन 
वेळ  वाया  दवडावा  कश्यापायी ?

आनंदात  दुसऱ्याच्या
मिळे  मोद जो  मनाला
हाव  अजून  ठेवावी  
हाव  अजून  ठेवावी  कश्यापायी ?

देह  बेचिराख  झाल 
भान  भाजून  निघाल 
काही  माघारी  उरल  कश्यापायी ?
देह  बेचिराख  झाल 
भान  भाजून  निघाल 
काही  माघारी  उरल  कश्यापायी ?, कश्यापायी ?

की  सूचना  कळणं  वाट  थांबणा  वळणा 
चित्त  स्थिर  राहिलच  कश्यापायी ?

आता  सादही  धास्ती  जिथ  जणांची  वसती 
परतून  हा  जुगार  कश्यापायी ?

निसर्गाची  माया  मोठी 
जाऊनिया  तिच्या  मिठी 
विसाव्या  बसू  नये  कश्यापायी ?
ऐसी  भयानक  कृती 
हिंस्त्र  श्वापदा  लाजवती 
प्रकृती  कि  विकृती  हि  माणसाची ?

मग  लोपला  काहूर  अन  गवसला  सूर 
शांततेन  भरपूर  घनदाट  या  वनात 
आयुर्वेद  शास्त्र  थोर  दावे  वाट  ज्या  म्होर 
मागे  वळून  पहाव  कश्यापायी ?

क्षण  जो  निसटला  भूत  जो  विसरला 
फिरून  जगवावा  कश्यापायी ?, कश्यापायी ?
सिनेमा - पक पक पकाक

No comments:

Post a Comment