Showing posts with label Ashwini Shende. Show all posts
Showing posts with label Ashwini Shende. Show all posts

Monday, May 7, 2012

आभास हा.

कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जिवा
कसा सावरू मी आवरू गं मी स्वतःला
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा...


क्षणात सारे उधान वारे झुळूक होऊनी जाती
कधी दूर तू हि कधी जवळ वाटे
पण काहीच नाही हाती
मी अशीच हसते उगीच लाजते
पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते
तुझाच साठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागताना मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा, आभास हा...

मनात माझ्या हजार शंका
तुला मी जणू कसा रे
तू असाच आहेस तसाच नाहीस
आहेस तू खरा कसा रे
तू इथेच बस न हळूच हस na
अशीच हवी मला तू
पण माहित नाही मला हि अजुनी
तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटी हि हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा , आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा , आभास हा

कधी दूर दूर कधी तू समोर
मन हरवते आज का
का हे कसे होते असे
हि आस लागे जीव
कशी सावरू मी आवरू रे मी स्वतःला
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा , आभास हा
छळतो तुला छळतो मला
आभास हा , आभास हा

चित्रपट -यंदा कर्तव्य आहे
गीतकार - अश्विनी शेंडे