Showing posts with label गुरु ठाकूर. Show all posts
Showing posts with label गुरु ठाकूर. Show all posts

Monday, October 22, 2012

कातरवेळी

कातरवेळी बसलो होतो
आठवणींचा पिंजत कापूस
तशात पाउस…..

ठुसठुसणारे घाव पुराणे
वीस्कटलेले डाव पुराणे
अन पुराणे काही उखाणे
सुटता झालो उगाच भावुक
तशात पाउस…..

त्यात कुठुनसा आला वारा
कापुस घरभर झाला सारा
पसार्‍यात त्या हरवुन गेलो
कधी अन कसा कुणास ठावुक
तशात पाउस…..

- गुरु ठाकुर

Wednesday, May 9, 2012

मन उधाण वा-याचे......

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे...... 

 तनाना तानानानानानानानानाना उ होहोहो.... 

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते 
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते 
सावरते बावरते झडते अडखळते का पडते 
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते 
मन तरंग होवून पाण्यावरती फिरते 
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते 
मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते 
मन उधाण वा-याचे...... 

रुणझूणते गुणगुणते कधी गुंतते हरवते 
कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते 
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते 
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते 
भाबडे तरी भासांच्या मागुनी पळते
मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते 
मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते 
मन उधाण वा-याचे......

चित्रपट -अगं बाई अरेच्चा 
गीतकार - गुरु ठाकूर

Tuesday, May 1, 2012

खेळ मांडला


तुझ्या  पायरिशी कुणी  सान थोर  नाही 
साद  सुन्या  काळजाची  तुझ्या  कानी  जाई हे ..
तरी  देवा  सारा  ना ह्यो  भोग  कशा  पायी 
हरवली  वाट दिशा  अंधारल्या  धाई
वावाळूनी  उधळतो  जीव  माया  बापा
वणवा  ह्यो  उरी  पेटला!!
खेळ  मांडला
खेळ  मांडला 
खेळ  मांडला ..
देवा ..खेळ  मांडला....
सांडली  ग  रीत  भात  घेतला  वसा  तुझा  
तूच  वाट  दाखीव  घ्या  खेळ  मांडला  दावी  देवा  
पैल  पार  पाठीशी  तू  रहा  उभा  
ह्यो  तुझ्याच   उंबऱ्यात   खेळ  मांडला !!!
हे ..
उसवल   गण  गोत सारा  आधार   कोणाचा    न्हाई   
भेगालाल्या  भुई  परी  जीणं  
अंगार   जीवाला  जाळी  
बळ  दे   झुंजायला   किरपेची   ढाल   दे  
इनविती  पंचप्राण   जेव्हरात  ताल  दे 
करपल  रान  देवा  
जळल  शिवार  
तरी  न्हाई  धीर  सांडला !
खेळ  मांडला देवा खेळ मांडला 
सिनेमा - नटरंग 
लेखक - गुरु ठाकूर
संगीत - अजय - अतुल