Wednesday, April 25, 2012

प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं..

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा 

मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा 
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत 
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ 
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं 
बाणावरती खोचलेलं 
मातीमध्ये उगवून सुध्धा 
मेघापर्यंत पोहोचलेलं 

शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस 
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...
कुसुमाग्रज 

30 comments:

  1. i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a million once again, Regards, Marathi Prem Kavita Sandeep Khare

    ReplyDelete
  2. खूपच छान आहे संग्रह

    ReplyDelete
  3. फार सुंदर कविता आहे

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर आहे कविता

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर आहे कविता लय आवडली मला 👌👌👌

    ReplyDelete
  6. Best writing in the world


    Khup chan

    ReplyDelete
  7. The best writing in the world
    Khup chan ho

    ReplyDelete
  8. खूप छान कविता आहेत

    ReplyDelete
  9. Chan real love must he like that instead of wasting time

    ReplyDelete
  10. तुमच्या मुळे आम्हाला कविता वाचायला मिळाल्या. खुप भारी आहे .अश्याच अनेक कविता आम्हाला वाचायला मिळाव्यात हीच इच्छा.खुप भारी सर . धन्यवाद सर

    ReplyDelete